
पाळधी:प्रतिनिधी
येथील सुपडूशाकी वाडी परिसरात गोवंश हत्या करण्याच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेल्या ५ गोमातांची पोलिसांनी धाड टाकून सुटका केली आहे. या कारवाईमुळे गोसेवकांकडून समाधान व्यक्त होत असून धर्मांध आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका घरामागे झाडाखाली २ गाई, २ गोवंश आणि १ बैल अशा एकूण ५ जनावरांना चारा-पाण्याविना करकचून बांधून ठेवण्यात आले होते. कत्तल करण्याच्या तयारीत असलेल्या या जनावरांची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून त्यांची मुक्तता केली. जप्त करण्यात आलेल्या या गोवंशाची किंमत सुमारे १ लाख ४२ हजार रुपये आहे.

मुक्या प्राण्यांना जीवदान:
पोलिसांनी या सर्व जनावरांना तत्काळ सुरक्षिततेसाठी पाळधी येथील ‘महागणपती गोशाळेत’ दाखल केले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी शेख शकील शेख गणी याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, परिसरात अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू बांधवांकडून होत आहे.




