लोकल न्यूज़
Trending

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त यवतमाळात अभिवादन

यवतमाळ | प्रतिनिधी – सुरज पवार

क्रांतिसूर्य, बहुजनांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

शहरातील आझाद मैदानाजवळील महात्मा फुले स्मारकास राज्याचे माजी मंत्री मा. ॲड. शिवाजीराव मोघे यांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण केला व महामानवाच्या स्मृतीस विनम्र वंदन केले. यावेळी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.

या कार्यक्रमास राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा. ना. प्रा. वसंतराव पुरके, पंचायत राज अभियानाचे संजय ठाकरेजी, खंदारे साहेब यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले यांनी दिलेला समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत असून त्यांच्या पावन स्मृतीस यावेळी कोटी कोटी प्रणाम करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!