
अनोरे | प्रतिनिधी : लक्ष्मण बाविस्कर (महाजन)
जयहर्ष सार्वजनिक सेवा फाउंडेशन, अनोरे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी अनोरे येथील बळीराम मन्साराम पाटील यांची कन्या तेजश्री बळीराम पाटील हिच्या विवाहप्रसंगी ₹१०,००० रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक सहाय्य करण्यात आले.
गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. समाजातील गरजू व गरजवंतांना विविध प्रकारे मदत करण्याचा संस्थेचा संकल्प असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सातत्याने चालना दिली जाईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत दगडू माळी, उपाध्यक्ष राकेश कैलास चौधरी, सचिव हरीभाऊ तुकाराम महाजन, सदस्य संतोषभाऊ चौधरी, ब्रिजेश जगदीशसिंग चव्हाण, विजय किरण महाजन, मनोज चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.





