महाराष्ट्रलोकल न्यूज़
Trending

पाळधी येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; २४ गरोदर माता व २२ बालकांची तपासणी

पाळधी (प्रतिनिधी): प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आणि “माझे गाव आरोग्य सम्पन्न गाव” अभियानांतर्गत पाळधी बुद्रुक उपकेंद्रात शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात पाळधी खुर्द व पाळधी बुद्रुक उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता, तसेच आजारी व सॅम-मॅम (SAM/MAM) बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली. बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय चौधरी आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भावना चौधरी यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, लोकनियुक्त सरपंच विजय पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरामध्ये २४ गरोदर माता व २२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झवर, सीएचओ डॉ. सायमा खान, तालुका आरोग्य निरीक्षक संजय ठाकूर, आरोग्य सहाय्यक अनिल महाजन, हितेश पाटील, आरोग्यसेविका चेतना पाटील, आरोग्यसेवक अतुल नन्नवरे, गटप्रवर्तक संगीता पाटील तसेच पाळधी खुर्द व पाळधी बुद्रुक येथील सर्व आशा सेविकांनी मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमामुळे गरोदर माता व बालकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि उपचार उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!