देशधर्मयुवालोकल न्यूज़
Trending

सावदे प्र.चा. (ता. एरंडोल) येथे युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न!

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हर घर योद्धा अभियान अंतर्गत १७ ते २५ जून या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावदे प्र.चा. येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. गावातील ३० युवतींनी कराटे, लाठी-काठी, नानचाकू चे प्रकार तसेच सेल्फ डिफेन्स टेक्निक्स शिकल्या. हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षक कु. धनश्री दहिवदकर यांनी युवतींना प्रशिक्षण दिले.

शिबिराच्या सांगतेच्या दिवशी पालकांच्या उपस्थितीत युवतींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्वतःचे रक्षण स्वतः करण्यास सज्ज झालो असा आत्मविश्वास युवतींमध्ये निर्माण झाला. सावदे गावच्या सरपंच सौ. रंजना पवार म्हणाल्या युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. हिंदु जनजागृती समिती युवतींना प्रशिक्षित करत आहे हे खूप कौतुकास्पद आहे.

बचत गटाच्या समुदाय संपादन व्यक्ती (CRP) ग्राम सखी सौ. अनिता चखाले यांनी पुढाकार घेऊन शिबिर आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!