लोकल न्यूज़

साळव्यात स्वातंत्र्यदिन वाजत, गाजत, साजत, नाचत आनंदोत्सवाने संपन्न

आनंदोत्सवाने संपन्न


साळवे ग्रामपंचायत, विविध सहकारी संस्था आणि ग्राम सुधारणा मंडळ, साळवे. संचलित साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प पू साने गुरुजी प्राथमिक सेमी विद्यालय व जिल्हा परिषद मुला-मुलींची शाळा साळवे. यांच्या संयुक्त विद्यमाने साळवे, ता धरणगाव, येथील झेंडा चौकावर विद्यार्थ्यांनी कवायत संचलन, पसायदान, महाराष्ट्र गीत व संविधान प्रास्ताविकेचे सादरीकरण करून विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य, भाषणे आणि गीत गायन करून ग्रामस्थांचे मने जिंकून घेतले.
सरपंच सौ आशा कोल्हे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, सचिव रमेश बोरोले व सर्व संचालक मंडळ. विकास सोसायटीचे चेअरमन किशोर बऱ्हाटे व सर्व संचालक मंडळ आणि गावातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ नागरिक, माता, पालक बंधू-भगिनी आणि तरुण मित्र मंडळ व विद्यार्थी मित्र मंडळी उपस्थित होते. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण सरपंच आशाताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी आर बोरोले यांनी केले. सूत्रसंचालन व्ही के मोरे यांनी केले.आभार प्रदर्शन मुख्याध्यापक एस डी मोरे यांनी केले. उत्कृष्ट साऊंड सिस्टिम सचिन सोनवणे यांनी दिले. ग्रामस्थांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी कौतुक केले, अभिनंदन करून रोख स्वरूपात बक्षिसे दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साळवे इंग्रजी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी आणि साळवे ग्रामपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!