महाराष्ट्र
स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनचालक सचिन मोहिते यांना ‘सर्वोत्कृष्ट वाहनचालक’ पुरस्कार.

नाशिक – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनचालक श्री. सचिन मोहिते यांना “नाशिक विभागातील सर्वोत्कृष्ट वाहनचालक” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नाशिक विभागाचे आयुक्त माननीय डॉ. प्रवीण गेडाम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. सचिन मोहिते यांना त्यांच्या सुरक्षित, तत्पर आणि शिस्तबद्ध वाहनचालक सेवेबद्दल हा सन्मान मिळाल्याचे सांगण्यात आले. जळगाव जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.




