धर्म

​शेलू (शें) येथे दिनांक २३ एप्रिल रोजी भव्य ‘नाम आप्पास्वामी भजन स्पर्धेचे’ आयोजन

आर्णी (जिल्हा यवतमाळ):

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शेलू (शें) (ता. आर्णी) येथे गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘श्री आप्पास्वामी नाम भजन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. आध्यात्मिक वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक भजनी मंडळे सहभागी होणार आहेत.

​आकर्षक बक्षिसे

​या स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी खालीलप्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत:

​प्रथम बक्षीस: (स्व. रुक्मिणाबाई विठ्ठलराव गावंडे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ) – माननीय उपायुक्त पुरुषोत्तम विठ्ठलराव गावंडे पाटील, शेलू यांच्याकडून.

  • ​द्वितीय बक्षीस: ११,००० रुपये.
  • ​तृतीय बक्षीस: ९,००० रुपये.

​चतुर्थ बक्षीस: ७,००० रुपये.

  • ​पाचवे बक्षीस: ५,००० रुपये.
  • ​सहावे बक्षीस: ४,००० रुपये.

​उद्घाटन व प्रमुख उपस्थिती

​या नाम स्पर्धेचे उद्घाटन ह.भ.प. श्री हर्षवर्धन महाराज आसंतेकर (श्री आप्पास्वामी महाराज संस्थान, रिसोड) यांच्या हस्ते संपन्न होईल. याप्रसंगी कृष्णा महाराज, दत्ता मार्कंड, माधव इंगळे, कमल महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

​तसेच, राज्याचे उपायुक्त माननीय पुरुषोत्तम विठ्ठलराव गावंडे पाटील आणि शेलूच्या माजी सरपंच नंदाताई दत्तात्रय गावंडे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन देविदास पवार करणार आहेत.

​या धार्मिक महोत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी व भजनी मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आप्पास्वामी नाम मंडळाचे कार्यकर्ते सतीश किसन गावंडे यांनी केले आहे.

​बातमीदार: सुरज सुधाकरराव पवार (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!