खेलधर्म

“हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या देशातील खेळाडूला IPL मध्ये का? कथावाचक श्री देवकीनंदन ठाकुरांचा KKR वर हल्लाबोल”

मुंबई | प्रतिनिधी

IPL स्पर्धेत एका संघाने बांगलादेशी खेळाडूला कोट्यवधी रुपयांना खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर कथावाचक देवकीनंदन ठाकुर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या मुद्द्यावरून त्यांनी संबंधित IPL संघ आणि त्याचा मालक शाहरुख खान यांच्यावर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्हिडीओ लिंक 👇

https://x.com/i/status/2006337500915311053

देवकीनंदन ठाकुर म्हणाले की, “ज्या बांगलादेशात हिंदू बांधवांची हत्या होत आहे, त्या देशातील खेळाडूला कोट्यवधी रुपये देऊन संघात का घेतले जाते? जर शाहरुख खान यांना खरोखरच बांगलादेशी हिंदूंच्या वेदना दिसत असतील, तर त्यांनी आपल्या संघातून त्या बांगलादेशी खेळाडूला तात्काळ बाहेर काढावे.”

यावेळी देवकीनंदन ठाकुर यांनी शाहरुख खान यांना थेट चेतावणी देताना म्हटले की, “जे लोक एखाद्याला हिरो बनवू शकतात, तेच लोक त्याला झिरो देखील बनवू शकतात.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून, काहींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी खेळ आणि राजकारण वेगळे ठेवावे, असे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, संबंधित IPL संघ किंवा शाहरुख खान यांच्याकडून या वक्तव्यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या वादग्रस्त वक्तव्यामुळे IPL आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागावर पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक चर्चेला तोंड फुटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!