भुसावळात ५ वर्षांच्या बालिकेचे भिक मागण्यासाठी अपहरण करणारा आरोपी ४८ तासांत बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात!

भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरात भिक मागण्यासाठी एका ५ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या आरोपीस केवळ ४८ तासांत अटक करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. या तत्पर कारवाईमुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ विभाग) श्री. संदीप गावीत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव विभाग) श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी वेगवान तपास सुरू करून आरोपीचा शोध लावला.
या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पाटील, पो. उपनिरीक्षक श्री. मंगेश जाधव, तसेच पो. हे.कॉ. विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, पो.शि. योगेश माळी, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, अमर अढाळे, जावेद शहा, हर्षल महाजन, जिवन कापडे, योगेश महाजन, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, मोहसिन शेख यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
स्थानिक गुन्हे शाखेकडून पो. उपनिरीक्षक रविंद्र नरवाडे, पो. हे.कॉ. उमाकांत पाटील, अक्रम शेख, गोपाल गव्हाळे, पो.ना. विकास सातदिवे, पो.शि. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे, उदय कापडणे, रविंद्र चौधरी, किशोर पाटील, तसेच नेत्रम कॅमेरा विभागातील पो.शि. मुबारक देशमुख, पंकज राठोड, आणि प्रणय पवार यांनीही या तपासात मोलाचे योगदान दिले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ आणि पो. हे.कॉ. रमण सुरळकर हे करीत आहेत.
या जलद कारवाईमुळे पोलिस प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, भुसावळ पोलिस दलाच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




