Uncategorized
Trending

आदर्श शिक्षक बी आर महाजन यांच्या सेवापुर्तिनिमित्त कार्याचा आढावा !

बी आर महाजन सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व : पी डी पाटील

धरणगांव – धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील कै बी जे महाजन विद्यालय येथील उपक्रमशील व आदर्श शिक्षक बी आर महाजन यांनी आपली निष्कलंक शैक्षणिक सेवा 30 वर्षे 17 दिवस पूर्ण करून हे 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहे.

        बी आर महाजन यांचे पूर्ण नाव भास्कर रामराव महाजन चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील रहिवासी नौकरी निमित्त 13 जून 1996 रोजी धरणगाव येथील आनोरे येथील कै बी जे महाजन विद्यालय येथे रुजू झाले. अतिशय प्रामाणिकरित्या त्यांनी आपली सेवा पूर्ण केली या कार्यकाळात त्यांनी धरणगाव तालुक्यात आपले नावलौकिक केले त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून राज्यस्तरीय , जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांचे विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तर , जिल्हास्तर येथे मिळवलेले यश उल्लेखनीय आहे त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर काम करीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सेवा करत असताना आपल्या सहकारी शिक्षक बंधू-भगिनी यांच्याशी समन्वय साधत आणि गावकऱ्यांशी व विद्यार्थ्यांची नाळ जोडून आपले काम प्रामाणिकपणे केले.एक हाडाचे शिक्षक बी आर महाजन सरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.

*”📙राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार “*

1.2004 साली देशाची राजधानी दिल्ली येथे “महात्मा जोतिराव फुले फेलोशिप अवार्ड ” देऊन सन्मान.

2. 2006 साली भारतीय मानव विकास सेवा संघ ठाणे येथे “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित.

3. 2020 साली “सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार ” देऊन सन्मानित

4 .2013 साली “राज्यस्तरीय साने गुरुजी शिक्षकरत्न पुरस्कार ” देऊन सन्मानित.

5.2018 जी पी एस फाउंडेशन जळगाव तर्फे “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार i देऊन सन्मानित.

*📗”विज्ञान प्रदर्शनात मिळवलेली यश “*

1.1997 ला मराठवाडा नांदेड येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन 1997 साली विद्यार्थ्यांच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड.

2. 2002 ला कोल्हापूर येथे शिक्षक गटात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्याची निवड.

3. 2012 ला बारामती पुणे येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्याची निवड

4. 2015 ला इन्स्पायर अवार्ड योजना अंतर्गत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या उपकरणांची निवड.

5. 2017 ला पुणे येथे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधाची राज्यस्तरावर निवड.

*”📘शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य “*

1. 2010 ला डॉ. होमी बाबा विज्ञान केंद्र मुंबई येथे विज्ञान विषयावर प्रकल्प सादर केला.

2. भारतीय महिला व मानवाधिकार या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभाग.

3. जागतिक एड्स दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन (व्याख्यान ,रॅली ,वकृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा )

4. स्वयंसहाय्यातून पुरुषांसाठी बचत गटाचे कार्य

5. पुष्पांजली काव्यसंग्रह जवळपास 25 कवितांचा संग्रह पुस्तक प्रकाशन तसेच बोधकथा, कथासंग्रह वर्तमानपत्रात प्रसिद्ध.

6. दैनिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून 25 वर्षे अविरत सेवा [ दै. लोकमत, दै.सकाळ, दै. गावकरी, दै.दिव्य मराठी ]

7. शाळेत विद्यार्थी शाकाहारी बनवण्यासाठी “करूणा क्लब ची स्थापना ” करून संस्थापक आरसी बाफना शाळेत येऊन क्लब ची स्थापना केली.

8. आपल्या जन्मभूमी उंबरखेड येथे गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मोफत “ग्रंथालय व वाचनालय ” 2010 ला सुरू केले.

9. अंधश्रद्धा निर्मूलन अभियानात जिल्हास्तरावर सहभाग.

10. तीस वर्षाच्या सेवेत विज्ञान प्रदर्शनात 20 वेळा तालुकास्तरीय , 15 वेळा जिल्हास्तरीय , व 5 वेळा राज्यस्तरावर यश.

11. 2016 ला नाशिक येथे नवीन अभ्यासक्रम आराखडा मसुदा अधिकारी म्हणून राज्यस्तरावर निवड.

12. शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान.

13. शाळेत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून विज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रमांचे दरवर्षी आयोजन.

14. एड्स निर्मूलन म्हणून शाळेत चित्रकला पोस्टर स्पर्धेचे आयोजन.

15. इयत्ता दहावीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाट व विकास व्हावा म्हणून रात्रीच्या वर्गाचे आयोजन.

16. तालुक्यातील विविध शाळांमध्ये विज्ञान विषयाचे व्याख्यानमालेत मार्गदर्शन.

17. पत्रकारीतेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला.

18. माध्यमिक शिक्षक संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून निवड.

         बी आर महाजन सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.आपल्या तीस वर्षाच्या सेवेच्या कार्यकाळात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आपल्याला दिसून येते. यासोबतच आपली कौटुंबिक जबाबदारी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. महाजन सरांचा चार भावंडांचा मोठा परिवार उंबरखेड येथे आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत आज सरांचे दोन्ही मुलं उच्चशिक्षित असून मोठा मुलगा हा ऑस्ट्रेलिया येथे नामांकित कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे. दुसरा मुलगा डॉक्टर असून वैद्यकीय सेवा करीत आहे. सरांच्या या कार्यात आमच्या मामीसाहेब जयश्री भास्कर महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे. अतिशय आनंदी व सुखी असा परिवार आहे. 30 जून 2026 ला सरांची सेवा पूर्ण होत आहे. सरांच्या हातून यापुढे समाजाची सेवा घडो सरांचे पुढील आयुष्य निरोगी, आनंददायी जावे हीच निर्मिकाचरणी प्रार्थना !

✒️शब्दांकन : पी डी पाटील

महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!