युवा
Trending

हेमकांत गायकवाड यांची न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी नियुक्ती

चोपडा प्रतिनिधी 

पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेने चोपडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार हेमकांत बळीराम गायकवाड यांची “महाराष्ट्र राज्य सदस्य” म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.

हेमकांत गायकवाड

संघटनेच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार हेमकांत गायकवाड यांची राज्य सदस्यपदी निवड करण्यात आली असून त्यांना संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे तसेच राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हि निवड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यासोबतच संघटनेत सदस्य म्हणून नोंदणी पूर्ण केल्याबद्दल त्यांना अधिकृत सदस्यत्व प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे. प्रमाणपत्रावर त्यांचा फोटो, नाव व पदनाम नमूद करण्यात आले असून ते “महाराष्ट्र राज्य सदस्य” या पदावर कार्यरत राहणार आहेत.

नियुक्तीपत्रात पत्रकारांच्या हितासाठी, पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी आणि संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वोत्तम योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्रकारांच्या हक्क व कल्याणासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

हेमकांत गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्राला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकारांच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!