जळगाव – सनातन संस्थेच्यावतीने जळगाव येथील सेवाकेंद्रात युवक – युवतींसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडले. त्यामध्ये जीवनाची दिशा, अध्यात्मिक संस्कार, सामाजिक भान
अशा विविध विषयांवर कुमारी सायली पाटील, कुमारी आदिती जाधव यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात अनेक युवक युवतींनी सहभाग घेतला. त्यानंतर सहा दिवसांचा ऑनलाईन कोर्स घेण्यात आला आणि सातव्या दिवशी प्रत्यक्ष क्रॅश कोर्स झाला. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.