महात्मा फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा !
प्रश्नमंजुषा स्पर्धा व विज्ञान शिक्षकांचा सन्मान !

धरणगाव प्रतिनिधी –
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते भारताचे शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर शाळेतील विज्ञान शिक्षक एम बी मोरे व व्ही पी वऱ्हाडे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्षांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देणारा इयत्ता सातवीचा विद्यार्थी रोहन रवी करोसिया याला रोख शंभर रुपये बक्षीस देऊन त्याचे कौतुक अभिनंदन केले.एस व्ही आढावे सर यांनी विज्ञान दिनाची माहिती सांगून अल्फ्रेड नोबेल, डॉ.ए पी जे अब्दुल कलाम व सी व्ही रमण या शास्त्रज्ञांविषयी विस्तृत माहिती सांगितली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार यांनी अंधश्रद्धा व कर्मकांड मोडीत काढून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असा मूलमंत्र दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन एस व्ही आढावे तर आभार पी डी पाटील यांनी मानले.




