महाराष्ट्र
Trending

कोचुर खुर्द येथे मधमाशीपालनावर प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न.

कोचुर खुर्द (ता.रावेर) : येथील शेतकऱ्यांसाठी मधमाशीपालन या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी राबविला.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मधमाशीपालनाचे महत्त्व, मधपेटीची रचना, मधमाश्यांचे प्रकार, वसाहतीचे व्यवस्थापन, मध काढण्याची शास्त्रीय पद्धत तसेच संरक्षणात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष मधपेटी दाखवून मध काढण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली.

यावेळी मधमाशीपालनामुळे पिकांच्या परागीभवनात वाढ होऊन उत्पादन वाढते, तसेच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो, यावर विशेष भर देण्यात आला. शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. 

कार्यक्रमास गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांमध्ये मधमाशीपालन व्यवसायाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात हा व्यवसाय स्वीकारण्याचा सकारात्मक प्रतिसाद शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!