लोकल न्यूज़

साळव्यात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जल्लोषात संपन्न.

विद्या मंदिराला फळा-खडू सप्रेम भेट दिले.

साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साळवे. तालुका धरणगाव येथे सन 2010 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळाचे खजिनदार डॉक्टर चंद्रकांत नारखेडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख दिनेश चौधरी, सरपंच पतीश्री संजय कोल्हे, निवृत्त शिक्षक एस टी पाटील, श्री एस एम झोपे, शाळेचे मुख्याध्यापक एस डी मोरे, जि प शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर नारखेडे, ज्येष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे, व्ही के मोरे, एस पी तायडे व माजी विद्यार्थी केंद्रीय विज्ञान संस्थेतील संशोधक डॉ ज्ञानेश्वर बोरसे हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला परिचय करून दिला व आपले मनोगत व्यक्त केले. शाळेबद्दल, गुरुजनांबद्दल व जेष्ठान बद्दल आदरातिथ्य व्यक्त केला. आपलं प्रापांचिक, व्यावसायिक व सामाजिक सलोखा राखून कशा पद्धतीने जीवनात श्रम व परिश्रम करून प्रगती साधत आहोत हे ऋण आम्ही फेडण्यासाठी शाळेत आलेलो आहोत अशा भावना व्यक्त केल्या. विद्या मंदिराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी छोटीशी भेट म्हणून फळा व खडू सप्रेम भेट दिले. व वेळोवेळी शाळेला भेट देऊन विविध पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय विज्ञान संस्थेचे संशोधक श्री ज्ञानेश्वर बोरसे म्हणाले की मी शाळेला माझ्या परीने पंचक्रोशी मध्ये विविध उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करेल. माजी विद्यार्थ्यांनी पटांगणावर कबड्डी, खो-खो अशी विविध मनोरंजनात्मक खेळ खेळून आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गायत्री पाटील यांनी केले आभार प्रदर्शन वैभव बराटे यांनी केले सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!