लोकल न्यूज़

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात श्री गणेशाची विद्यार्थ्यांच्या लेझीम व ढोल ताशाच्या गजरात स्थापना

प्रतिनिधी- विकास चव्हाण

धरणगाव -येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा संस्थेचे उपाध्यक्ष मा चिंतामण पाटील यांनी सपत्नीक श्री गणेशाची स्थापना केली. या उत्सवात शाळेतील   सिंहगर्जना ढोल पथक व विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाने उपशिक्षक वाय पी पाटील यांच्या घरापासून गणपतीची मूर्ती बैलगाडीवर विराजमान करून मिरवणूक शहरभर काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ढोल ताशाचे व लेझीमचे सुंदर प्रदर्शन केले. त्यांच्या या प्रदर्शनाने शहरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सोहळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा. हेमलालशेठ भाटिया, सचिव मा. ललितजी उपासनी संस्थेचे मार्गदर्शक प्रा रमेश महाजन तसेच मुख्याध्यापक जीवन पाटील , मुख्याध्यापक एस एस पाटील, बालकमंदिर विभाग प्रमुख मीनाक्षी वारुळे तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी व शाळेतील सर्व शिक्षक. शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले होते. या ढोल पथक व लेझीम पथक यांना शाळेतील क्रीडा शिक्षक एस एल सूर्यवंशी, योगशिक्षक आर.डी महाजन यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक समितीचे प्रमुख वाय पी पाटील व सदस्य यांनी तसेच के जे पवार ,अनिल पाटील आदी शिक्षकांनी सहकार्य केले. मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांसाठी तात्कालिक समित्या करून विद्यार्थ्यांना केळी लाडू व पाण्याची व्यवस्था शाळेतील उपशिक्षकांनी केली. तसेच रांगोळी सजावटीसाठी बालक मंदिर विभागाच्या सर्व शिक्षिका यांनी व स्थापनेची सजावट शाळेतील शिक्षिका भगिनी यांनी व्यवस्था पाहिली.गणेश स्थापनेचा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!