खेलयुवालोकल न्यूज़
Trending

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “कृष्ण लीला” वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.

पाळधी प्रतिनिधी

दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी, इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी व इंपिरियल प्री प्रायमरी स्कूल, जळगाव यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने “कृष्ण लीला” हा प्री- प्रायमरी विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे चेअरमन, इंजि. श्री नरेश चौधरी, सौ प्रियांका सोनी, सौ वैशाली झाल्टे, सौ कविता सोनार तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, जे आता उच्च पदस्त म्हणून कार्यरत आहेत असे तेजपाल पाटील, पूर्वेश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृष्ण लीलेवर आधारित नृत्यनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, राधा संग च्या रासलीला, मटकी फोड अशा विविध प्रसंगांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा, रंगीत सजावट आणि सुरेख संगीतामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.

शाळेचे चेअरमन इंजि. श्री नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, तसेच भारतीय संस्कृतीची ओळख होते. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, शाळेचे कार्यकारी अधिकारी श्री. जी. डी. पाटील, प्राचार्य विवेक रुपनर, सौ भाग्यश्री आळंदे, सौ विद्या पाटील यांनी केले होते. शेवटी श्री चंद्रकांत तायडे यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. “कृष्ण लीला” या वार्षिक स्नेहसंमेलनामुळे शाळेत आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!