खेल
धरणगाव कुस्तीआखाड्याचे पी एम पाटील सर माजी नगराध्यक्ष धरणगाव यांच्या शुभहस्ते उद्घाटन
धरणगाव कुस्ती आखाडा

धरणगाव कुस्ती आखाड्याचे पी एम पाटील सर माजी नगराध्यक्ष धरणगाव यांच्या शुभहस्ते उद्घाटन
- धरणगाव तालुक्यातील धरणगाव येथे शंभर वर्षाचे परंपरा असलेल्या श्री व्यायाम प्रसारक मंडळ या संस्थेतर्फे श्रावण महिन्यामध्ये मरीआईची यात्रा भरते या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या दंगल असतात या दंगलींमध्ये राज्यभरातून मुले येत असतात त्यात युवतींच्या सुद्धा सहभाग असतो या शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या व्यायाम प्रसारक मंडळाच्या दर मंगळवारी कुस्त्या भरतात यावेळेस धरणगाव शहरातील व जिल्ह्यातील विविध मान्यवरण बोलण्यात येते दिनांक 5 ऑगस्ट रोजी कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. याची सुरुवात करण्यासाठी आघाड्याच्या पूजनासाठी हा बहुमान धरणगाव येथील जळगाव जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष धरणगाव पी एम पाटील सर देण्यात आला. त्यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले व विविध मल्लांच्या कुस्ती सुद्धा लावण्यात आले पी एम पाटील सर यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी,जीवन आप्पा बयस, लोकमत पत्रकार भगीरथ माळी तसेच पोलीस विभागाच्या मान्यवरांकडून विविध मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आला.
या प्रसंगी श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास आप्पा विसावे,सचिव येवले साहेब,संचालक देविदास महाजन,प्रकाश पाटील,किशोर महाजन पैलवान,कैलास माळी सर,गुरु पैलवान,राजूभाऊ धनगर,विलास येवले,सुनील भाऊ चौधरी,गोपाल पाटील,रविभाऊ जाधव, शफिभाई शहा गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ व धरणगाव शहरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





