क्राइम
Trending

​जळगाव व जामनेरमधील ६ गुंडांची एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारी; प्रांताधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

​जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहर आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जळगाव व जामनेर तालुक्यातील सहा सराईत गुन्हेगारांवर प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी एका वर्षासाठी हद्दपारीची (तडीपार) कारवाई केली आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

​पोलीस प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर

​मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आणि जामनेर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ व ५७ नुसार ही कारवाई करण्यात आली. फत्तेपूर (जामनेर), रामानंदनगर, जिल्हापेठ आणि नशिराबाद पोलीस निरीक्षकांनी या गुंडांचा सविस्तर तपशील सादर केला होता. त्यानंतर जळगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर प्रांताधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले.

​हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

​प्रशासनाने खालील सहा जणांना एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे:

  1. ​सुनील पांडुरंग पारधी (फत्तेपूर, जामनेर)
  2. ​विजय पांडुरंग पारधी (फत्तेपूर, जामनेर)
  3. ​अमोल उर्फ चिक्या शंकर कोकाटे (हरीविठ्ठलनगर, जळगाव)
  4. ​उमेश उर्फ उमाकांत दत्तात्रय धोबी (पिंप्राळा, जळगाव)
  5. ​महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (पिंप्राळा, जळगाव)
  6. ​फिरोज शहा नूर शहा (नशिराबाद, जळगाव)

​सुरक्षेच्या दृष्टीने कडक पाऊल

​जळगाव व पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सहाही जणांना आता दिलेल्या मुदतीत जिल्ह्याच्या हद्दीबाहेर राहावे लागणार आहे. आगामी काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अशाच प्रकारच्या इतर गुन्हेगारांवरही कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!