महाराष्ट्रराजनीतिलोकल न्यूज़

भाजप जळगाव पश्चिम वैद्यकीय आघाडीला नवे नेतृत्व डॉ.नितीन पाटील जिल्हाध्यक्षपदी

▪️पक्षाच्या धोरणासह वैद्यकीय सेवेच्या विस्ताराची ग्वाही; डॉ.नितीन पाटील

धरणगाव प्रतिनिधी – रवींद्र निकम

धरणगाव : भारतीय जनता पक्षाच्या जळगाव पश्चिम जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.नितीन वसंतराव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने पक्षाच्या वैद्यकीय सेवेची व्याप्ती वाढवून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार डॉ.पाटील यांसह नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ही नवी कार्यकारिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात आणि प्रदेश महामंत्री विजय चौधरी, वि.सं.मंत्री रवी अनासपुरे, खा. स्मिता वाघ, आ.सुरेश भोळे, आ.मंगेश चव्हाण, आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या संमतीने जाहीर करण्यात आली.
        डॉ.नितीन पाटील यांनी जिल्हाध्यक्षपद स्विकारताना, “पक्षाच्या धोरणांसह वैद्यकीय आघाडीमार्फत समाजसेवा अधिक प्रभावीपणे राबवू,” आणि नव्या कार्यकारिणीच्या सदस्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील उपक्रमांना गती देत सामान्य नागरिकांसाठी तत्परत असल्याचे ध्येय डॉ.पाटील यांनी जाहीर केले. नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, उपाध्यक्ष पी सी पाटील, ज्येष्ठ नेते डी जी पाटील, शेखर अत्तरदे, ॲड.संजय महाजन, जिल्हा सरचिटणीस कन्हैय्या रायपूरकर, चिटणीस सौ.माधुरी अत्तरदे, जिजाबराव पाटील, कैलास माळी, ईश्वर सावंत, जगन महाजन, डॉ.ओंकार मुंदडा, किशोर झंवर, मंडळाध्यक्ष दिनेश पाटील, निर्दोष पवार, माधव पाटील, ललित येवले, दिलीप महाजन, डॉ.विजय पाटील, चंदनराव पाटील, संजू पवार, यांसह असंख्य मान्यवरांनी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देत यशस्वी कार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!