धरणगाव येथील लॅण्ड जिहाद प्रकरणा विरोधात गायरान बचाव मंचची तक्रार


धरणगाव येथील सरकारच्या मालकीच्या गट. क्र.९४७ मध्ये मुस्लीम समुदायाच्या लोकांनी कब्रस्थानाचे बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे उघडकीस आलेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, धरणगाव येथील गट. क्र.९४७ याचे क्षेत्र २५ एकर इतके असून ही सरकारचे मालकीची मिळकत असून सरकारच्या वतीने नगरपालिका, धरणगाव यांना ही जमीन व्यवस्थेसाठी दिलेली आहे. त्या मिळकतीमध्ये मुस्लीम समुदायाच्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. सदर जमिनीपैकी काही जमीन ही न.पा. प्रशासनाकडे सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपणासाठी मागितली व ती न.पा.ने त्यांना दिली. प्रत्यक्ष वृक्षारोपण करीत असतांना मुस्लीम समुदायाने वृक्षारोपणासाठी विरोध केला.
सदर बाब गायरान बचाव मंचच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली व गायरान बचाव मंचने सदरची बाब नगरपालिका प्रशासनाच्या व म. तहसिलदार सो. यांच्या निदर्शनास आणून दिली. *वास्तविक मुस्लीम लोकांना शासनाने धरणगाव येथील गट क्र.७६५ याचे क्षेत्र १५ एकर ही कब्रस्थानासाठी दिलेली आहे. त्या कब्रस्थानाला शासकिय निधीतून संरक्षण भिंत देखील केलेली आहे.* सदरचे कब्रस्थान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कब्रस्थान असून देखील मुस्लीम समुदायाचे लोक शासनाच्या गट क्र.९४७ वर अतिक्रमण करीत आहेत.
सन १९३६ साली कलेक्टर यांनी सदर मिळकत ही मुस्लीम म्हसनवटकडे वर्ग केली होती. परंतू सदर नोंद ही म.आयुक्त सो. यांनी सन १९३७ साली रद्द केली होती. सन १९३६ साली झालेल्या नोंदीचा गैरफायदा घेवून मुस्लीम लोकांनी त्या जमिनीवर कब्रस्थानाचे अतिक्रमण करून त्याठिकाणी दिनांक ०९/०८/२०२५ रोजी रात्री ०९:०० वाजता बेकायदेशीररीत्या दफनविधी केलेला आहे. म्हणजेच मुस्लीम लोक त्याद्वारे शासकिय जमीन बळकाविण्याचे कृत्य करीत आहे. म्हणजेच हा लॅण्ड जिहादचाच प्रकार आहे. ही बाब गायरान बचाव मंचने म. तहसिलदार सो. यांचे निदर्शनास आणून दिली. त्यावर म. *तहसिलदार सो. यांनी सर्व जागेची पाहणी व चौकशी करून आदेश क. जमीन/कावि/ई-ऑफिस क./२०२५ दिनांक ११/०८/२०२५ रोजी पारित करून म.मुख्याधिकारी सो. न.पा. यांना सदर मिळकतीवरील सर्व अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिलेले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.* त्यामुळे सदरचे संपूर्ण अतिक्रमण काढण्यात यावे व म. तहसिलदार सो.धरणगाव यांचे आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आम्ही आज रोजी म. मुख्याधिकारी सो, नगरपालिका यांना गायरान बचाव मंच तर्फे निवेदन देत आहोत.
सदरचे संपूर्ण अतिक्रमण काढण्यात यावे तसेच सदरच्या लॅण्ड जिहादच्या प्रकारास तात्काळ प्रतिबंध करण्यात यावा यासाठी निवेदन देत आहोत. परंतू नगरपालिका प्रशासनाने *गट क्र.९४७ वरील सर्व अतिक्रमण काढले नाही तर यापुढे आम्ही व्यापक जनजागृती करु, गावातील सर्व नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवू, त्या सहयांचे निवेदन शासनाला व प्रशासनाला देवू तरी सुद्धा अतिक्रमण न काढल्यास आंदोलन करू, साधू संतांच्या नेत्तृत्वात भव्य मोर्चा देखील काढू तरी देखील अतिक्रमण न निघाल्यास उपोषण करू* अशी कार्यक्रमाची पुढील रूपरेषा राहिल असे गायरान बचाव मंच तर्फे सांगण्यात आलेले आहे



