
धरणगाव |विशेष प्रतिनिधी- विकास पाटील
धरणगाव तालुक्यातील रेल गावात क्रिकेट खेळताना एका मुलाने छातीत बॅट मारल्याने १२ वर्षीय गणेश पाटील याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र, हा मृत्यू अपघाती नसून मागील भांडणाची दुष्मणी काढण्यासाठीच मुलाला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत मुलाच्या पित्याने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पाटील हा मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक खाली पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार केले.





