महाराष्ट्रलोकल न्यूज़
Trending

तुकाराम बिजनिमित्त गुणवंतांचा गुणगौरव व महाप्रसाद…

धरणगाव — येथील लहान माळी वाडा परिसरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने संत तुकाराम महाराज बिजनिमित्त आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या सांगता प्रसंगी गुणवंतांचा गुणगौरव, मान्यवरांचा सत्कार व महाप्रसादाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.

                  याबाबत सविस्तर वृत्त असे की, सलग 38 वर्षांपासून अविरतपणे सुरु असलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची परंपरा यावर्षी देखील अतिशय उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. मागील आठ दिवसात सकाळी काकडा आरती, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरीकीर्तन असा नित्यक्रम सुरु होता. आज जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या बीजेनिमित्त हभप प्रा सी एस पाटील सरांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धरणगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष लिलाबाई सुरेश चौधरी तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कीर्तनानंतर गाव परिसरातील तसेच बाहेरील सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन खजिनदार लक्ष्मणराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संचालक गणेश पाटील यांनी केले. कै शंकर विठ्ठल पाटील, कै शांताबाई शंकर पाटील, कै प्रभाकर शंकर पाटील, कै शरद शंकर पाटील, कै रविंद्र शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ राजेंद्र शंकर पाटील यांच्या आर्थिक सहकार्यातून तसेच हभप प्रा सी एस पाटील सर यांच्या संयोजनाने आणि समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांच्या आयोजनाने हा अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह दरवर्षी होत असतो. या सप्ताहाला समस्त माळी, चौधरी, मराठे, न्हावी समाज पंच मंडळ व सर्व समाज बांधव तसेच श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, संत सावता माळी भजनी मंडळ मोठा माळी वाडा, जयहिंद व्यायाम शाळा, नाथ भक्त परिवार ग्रुप धरणगाव यांचे अनमोल सहकार्य लाभते. 

             सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, खजिनदार लक्ष्मणराव पाटील, माजी अध्यक्ष भिमराज पाटील, जेष्ठ संचालक चुडामण पाटील, कैलास पाटील, मोहन पाटील, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, वाल्मिक पाटील, गणेश पाटील, आनंद पाटील, मंगेश पाटील, अशोक पाटील, गुलाब पाटील, परशुराम पाटील, रतनराव पाटील, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, समाधान पाटील, शिपाई गणेश निकम अजय बोरसे यांच्यासह संत तुकाराम महाराज बीज उत्सव समितीचे भागवत महाजन, मुकेश पाटील, अमोल पाटील, रितेश पाटील, पवन पाटील, महेश पाटील, सतिष पाटील, रोहीत भदाणे, समाधान पाटील, सागर पाटील, अक्षय पाटील, डिगंबर पाटील, हिमांशु पाटील, सुमित महाजन, रुपेश मराठे, प्रथम पाटील, पंकज पाटील, गोपाल पाटील, परशुराम पाटील, मनिष पाटील, हरिष पाटील, जयेश महाजन, सुमित पाटील, जयेश पाटील, राहुल पाटील, आबा महाजन, नकुल पाटील, भूषण पाटील, समाधान पाटील, सचिन मराठे, जितेंद्र पाटील पाटील, रोहीत पाटील यांच्यासह लहान माळी वाडा परिसरातील सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. सप्ताहाला सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, पुरुष मंडळी, महिला वर्ग, युवक अबालवृद्ध यांची लक्षणीय उपस्थिती होते. सायंकाळी जगद्गुरू तुकोबांची पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा व भारुडाचा कार्यक्रम संपन्न होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!