क्राइममहाराष्ट्र
Trending

धरणगाव नाभिक दुकानदार संघटनेतर्फे खमताने येथील घटनेचा तीव्र निषेध.

धरणगाव | प्रतिनिधी
खमताने (ता. बागलाण, जि. नाशिक) येथे अल्पवयीन बालिकेवर ७० वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याच्या संतापजनक घटनेचा धरणगाव नाभिक समाज दुकानदार संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज संघटनेच्या वतीने धरणगाव तहसीलदार मा. महेंद्र सूर्यवंशी साहेब तसेच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात सदर आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ व योग्य न्याय मिळावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी, असेही संघटनेने नमूद केले.

यावेळी नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सतीश बोरसे, उपाध्यक्ष गणेश झुंजारराव, सचिव दिगंबर निकम, नाभिक महामंडळ कार्यकारिणी सदस्य राजेंद्र अण्णा फुलपगार, नाभिक महामंडळ अध्यक्ष रवी निकम, तालुकाध्यक्ष महेश निकम, संजय झुंजारराव, अध्यक्ष अशोक झुंजारराव, कमलेश बोरसे, गोपाल फुलपगार, भूषण वारुळे, सुभाष बोरसे, बापूजी फुलपगार, सचिन ठाकरे, मोहन फुलपगार, महेंद्र निकम, उज्वल महाले, भैया झुंजारराव, ज्येष्ठ समाजसेवक गजानन फुलपगार यांच्यासह असंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

या अमानवी कृत्याचा समाजातील सर्व स्तरातून निषेध होत असून आरोपीला कठोर शिक्षा देऊन पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!