महाराष्ट्रलोकल न्यूज़

जळगाव पोलिस श्वान पथकात ‘गुरु’ची नेमणूक, ‘जंजीर’ गौरवाने सेवानिवृत्त.

जळगाव/प्रतिनिधी – जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात आज एका छोटेखानी समारंभात जळगाव पोलीस दलातील श्वान पथकात नवीन श्वान ‘गुरु’ची नेमणूक करण्यात आली. तर दीर्घ काळ सेवेत राहिलेल्या ‘जंजीर’ या श्वानाला आज सेवानिवृत्ती देण्यात आली.

‘जंजीर’ने आपल्या सेवाकाळात अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. बॉम्ब शोध मोहिमा, गुन्हे तपास कार्यवाही आणि विविध ऑपरेशन्समध्ये त्याने पोलिस दलाला मोलाची साथ दिली. त्याच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयात त्याचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, नवीन श्वान ‘गुरु’च्या नेमणुकीमुळे जळगाव पोलिस श्वान पथकाला नवीन जोम आणि बळ मिळाले असून, गुन्हे उकलण्याच्या प्रक्रियेत याचा मोठा फायदा होणार असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले.

या कार्यक्रमास वरिष्ठ पोलिस अधिकारी, श्वान पथकातील कर्मचारी तसेच पोलिस दलाचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!