हरित व समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत धरणगावात शेकडो वृक्षारोपण

महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र व समृद्ध महाराष्ट्र या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत धरणगाव तालुक्यातील शेकडो ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. 
जिल्हा समादेशक होमगार्ड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या आदेशानुसार, तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. आर.एम. काळे, केंद्र प्रमुख गंगाधर महाजन आणि वरिष्ठ निदेशक मदन रावते यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.

तालुका समादेशक अधिकारी ईश्वर महाजन यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव होमगार्ड पथकाने दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी (रविवार) शहरासह ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड केली. या वेळी आंबा, चिंच, सिसम, नीम, बांबू अशा विविध प्रकारच्या शेकडो रोपांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमावेळी लिपिक जानकीराम पाटील, होमगार्ड अनिल सातपुते, आत्माराम चौधरी, रविंद्र बडगुजर, सुरेश माळी, हर्षल सावंत, गणेश सावंत, संदीप पाटील यांच्यासह अनेक होमगार्ड उपस्थित होते.
सदर उपक्रमामुळे तालुक्यातील पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून नागरिकांनी या अभियानाचे कौतुक केले आहे.




