
प्रतिनिधी – विकास चव्हाण
धरणगाव– येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सारजाई कडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील ज्येष्ठ लिपिक आप्पासाहेब शिरीषसिंह बयस यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हेमलाल शेठ भाटिया, उपाध्यक्ष चिंतामण पाटील, सचिव ललितजी उपासनी सर्व सन्माननीय संचालक मंडळ संस्थेचे मार्गदर्शक प्रा रमेश महाजन तसेच मुख्याध्यापक व्ही बी पाटील मुख्याध्यापक एस एस पाटील,बालक मंदिरच्या प्रमुख मीनाक्षी वारुळे तसेच शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित होते 15 ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक पसायदान सादर केले. व शाळेतील योगशिक्षक आर डी महाजन यांनी पसायदानाचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून दिला. यासोबत पसायदान व त्याच्या अर्थ असलेले पत्रक प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आले. तसेच इयत्ता 7 वी तू. क च्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्वांसमोर पसायदान सादर केले. त्यांना त्यांचे वर्गशिक्षक श्री कैलास माळी यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर केले. त्यांचे कवायत पाहून संस्थेचे पदाधिकारी व गावातील नागरिकांनी कौतुक केले. त्या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एस एल सूर्यवंशी व आर डी महाजन यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच या विद्यार्थ्यांनी नगरपालिकेत या संगीतमय कवायत सादर केल्याने तेथील सर्व अधिकारी व उपस्थित नागरिकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रभात फेरीत (इको) निसर्ग वाचवा असा संदेश देत हिरवे टी-शर्ट व टोपी घालून विद्यार्थ्यांनी निसर्ग वाचवाच्या घोषणा दिल्या. ह्या विद्यार्थ्यांना श्री किशोर चौधरी व किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले. यासोबत इयत्ता पाचवी व सहावी च्या विद्यार्थ्यांनी स्काऊटचे उत्कृष्ट पथक गणवेशासह प्रभात फेरीत सहभाग नोंदवला. स्काऊटच्या श्रीमती रजनीराणी पवार व श्री सचिन देसले यांचे गाईड मिळाले. यासोबत सर्व शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची 750 वी जयंतीवर्ष निमित्ताने भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. या पालखी सोहळ्यासाठी एन पी वाणी, एन बी ठाकरे , एम के गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस संस्थेचे मार्गदर्शक प्रा रमेश महाजन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून कौतुक केले, अभिनंदन केले.. सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीचे प्रमुख वाय पी पाटील तसेच समितीतील सर्व सदस्य, क्रीडा समितीचे प्रमुख एस एल सूर्यवंशी सर्व सदस्य व विविध समितीतील सर्व प्रमुख, सदस्य यांनी परिश्रम घेतले. यासोबत शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही खूप मेहनत घेतली एकंदरीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला..





