टॉप न्यूज़लोकल न्यूज़

धरणगाव ग्रामीण रुग्णालयात रात्री ९.३० वाजता डॉक्टर, नर्स, कर्मचारी गायब – सर्पदंश पीडित उपचाराविना

सर्पदंश पीडित उपचाराविना

धरणगाव (जि. जळगाव) –तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयात बेफिकीर प्रशासनाचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. दिनांक ०८/०८/२०२५ शुक्रवारी रात्री ९.३० वाजता सर्पदंश झालेल्या रुग्णाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टर, नर्स, वार्डबॉय किंवा इतर कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता.

या गंभीर परिस्थितीमुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. धरणगाव शहर व तालुक्यातील एकमेव रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारीच उपलब्ध नसणे ही चिंताजनक बाब असून, स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

  1. पत्रकार राजेंद्र वाघ यांनी हा प्रकार व्हिडिओद्वारे नोंदवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.त्यांनी वैद्यकीय प्रशासनास तातडीने कायमस्वरूपी एक डॉक्टर नेमण्याची मागणी केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!