पिंप्री खुर्द ग्रामपंचायतीत महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन.


पिंप्री खुर्द (ता. धरणगाव) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी मा. मंगलआण्णा पाटील, डी. बी. मनोरे सर, गोपाल बडगुजर, आबा धोबी, गोकुळ वजिरे सर, एडवोकेट गजरे साहेब, प्रकाश लोखंडे, रमेश पांडे, शांताराम मोरे, बापू नरवाडे, गौतम दोडे, कृष्णा मोरे, सिराज कुरेशी, रोहित मोरे, संजय बडगुजर, आशिष सपकाळे, निलेश बडगुजर, भरत बडगुजर, तुषार चौधरी, सुभाष सोनवणे यांसह ग्रामस्थांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समतेचा, बंधुतेचा आणि संविधानिक मूल्यांचा संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता शांतता व सद्भावनेच्या वातावरणात झाली.




