धर्मलोकल न्यूज़
धरणगावात भगव्या उत्सवाचा जल्लोष, गणरायाचे वाहन आकर्षणाचा केंद्रबिंदू

धरणगावात भगव्या वातावरणात उत्सव साजरा
धरणगाव शहरात आज साला-बादा प्रमाणे भगव्या रंगात नटलेले वातावरण दिसून आले. विविध ठिकाणी देवीची घटस्थापना करण्यात आली. तसेच बालाजी वाहन मंडळातर्फे गणरायाचे आकर्षक वाहन काढण्यात आले.
या वाहनाचे जोडीचे मानकरी वास्तू मार्बलचे श्री. जीवन सेठ (राजस्थानवाले) होते. त्यांनी वाहन घेऊन आपला मान पूर्ण केला.
उत्सवात विविध मंडळांच्या लेझीम पथकांनी सहभाग घेतला. शहरवासीयांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्याचा आनंद लुटला.
यावेळी धरणगाव पोलीस स्टेशन व होमगार्ड पथक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




