धरणगावात श्रीजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदीला सुरुवात.

धरणगाव (ता.२७ ऑगस्ट, बुधवार)
गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आज धरणगाव शहरातील श्रीजी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथे नवीन कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. या शुभारंभ प्रसंगी धरणगाव नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष व युवासेना जिल्हाप्रमुख निलेश सुरेश चौधरी, सागर करवा, शिल्पेश गुजराथी व निखिल बयस यांच्या हस्ते पूजन व कापूस खरेदीचा प्रारंभ झाला.
या वेळी श्रीजी जिनिंगचे संचालक श्री. नयनकुमार गुजराथी, श्री. सुरेश नाना चौधरी, श्री. जीवन आप्पा बयस व सौ. शकुंतला ताई करवा तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात निलेश चौधरी यांच्या हस्ते काटा पूजन पार पडले. यावेळी पहिल्या कापूस उत्पादक शेतकरी घनश्याम रामभाऊ पाटील (बांभोरी) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना नव्या कापसाला प्रति क्विंटल ७६५३ रुपये असा दर देण्यात आला.
आज पहिल्याच दिवशी कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधून नव्या कापसाची आवक झाली असून सुमारे १२०० क्विंटल नवीन व २५०० क्विंटल जुना कापूस खरेदीसाठी आणण्यात आला. त्यामुळे खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली.




