धानोरे गावचा सुपुत्र कल्पेश महाजन इंडियन नेव्हीत दाखल; गावात जल्लोष

प्रतिनिधी – लक्ष्मण बाविस्कर (महाजन)
धानोरे (ता. धरणगाव) : गावचे सुपुत्र कल्पेश रविंद्र महाजन आडगावकर यांची नुकतीच इंडियन नेव्हीमध्ये नियुक्ती झाली असून गावात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. या आनंदोत्सवाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी कल्पेशची मिरवणूक काढून त्याचा सत्कार केला.

मूळचे आडगाव (ता. चोपडा) येथील असलेले कल्पेश व त्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे कुटुंब धानोरे येथे वास्तव्यास आले. शिक्षणासोबतच कल्पेशने मोलमजुरी करत शिक्षण पूर्ण केले. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न साकार केले.

संपूर्ण गावाच्या उपस्थितीत झालेल्या सत्कार सोहळ्यात उपसरपंच अशोक शामराव पाटील, पोलिस पाटील सुरेश गंगाराम पाटील, पांडुरंग पंडित पाटील, शरद आसाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आनोरे, धानोरे व गारखेडा येथील मित्रमंडळी, गावकरी आणि ग्रामस्थांनी कल्पेशवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी श्री. लोटन गंगाराम पाटील यांनी सर्व गावकऱ्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था करून कार्यक्रमाला उत्साह आणला.
दरम्यान, गावात बैल पोळा उत्सव सुद्धा उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामुळे कल्पेशच्या नेव्ही भरतीचा आनंद आणि बैल पोळ्याचा सण यांचा संगम
गावकऱ्यांनी कल्पेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत भारतीय नौदलातील सेवेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




