धरणगाव तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न


धरणगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव शासकीय तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय, बोरखेडा वंजारी खपाट येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. जे. पी. शिरसाट यांनी उपस्थित राहून हातातील मशाल ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव तालुका गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले मॅडम, वंजारी गावाचे सरपंच दादा सो. शंकर पाटील, पोलीस पाटील गडबड दादा अहिरे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक बी. जे. पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. पाटील सर यांनी केले, तर तालुका समन्वयक मा. सचिन सूर्यवंशी सर यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
धरणगाव तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. पंच म्हणून के. एस. पाटील सर, दिलीप गावित सर, शशिकांत पाटील सर, दीपक पाटील सर, बोरसे सर, निलेश चौधरी सर व वी. टी. पाटील सर यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी यजमान शाळेचे क्रीडा शिक्षक राजेश पावरा सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




