सारजाई कुडे व बालकवी विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश.

धरणगाव प्रतिनिधी- विकास चव्हाण
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सारजाई कुडे विद्यालय व बालकवी ठोंबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत रोहित महाजन (41 कि.गटात प्रथम), नयन पाटील (62 कि.गटात प्रथम), पवन महाजन (55 कि.गटात प्रथम), क्रीष्णा चौधरी (65 कि.गटात प्रथम – ग्रीको शैली), तसेच सौरव महाजन (65 कि.गटात प्रथम – फ्री स्टाईल) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, उपाध्यक्ष चिंतामण पाटील, सचिव ललितजी उपासनी, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, मुख्याध्यापक जीवन पाटील तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे शाळेतील क्रीडाशिक्षक एस. एल. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.



