महाराष्ट्रलोकल न्यूज़

पाळधीत ७५० शिक्षकांचा सन्मान: “शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शक” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाळधी, धरणगाव (प्रतिनिधी): शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील सु. गो. की. लोन विद्यालयात रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) आयोजित जळगाव व धरणगाव तालुक्यातील शिक्षक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे यांनीही शिक्षकांच्या अनमोल योगदानावर प्रकाश टाकला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. शिक्षक हा समाजाचा आत्मा आहे. जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या हा आजचा मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयतेचे नाते जोडून हा प्रश्न सोडवावा.” तर विठ्ठल कांगणे यांनी सांगितले, “गुरुचा अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी घडतात, चुकतात आणि पुन्हा प्रगती करतात. बदलत्या काळातही जिद्दी आणि समर्पित शिक्षकच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात. शिक्षकांनी अराजकीय राहून फक्त विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे.”
या सोहळ्यात जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांतील सुमारे ७५० शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि हलक्या-फुलक्या वातावरणात हशा, टाळ्यांचा कडकडाट आणि भावनिक क्षणांनी हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!