दिल्ली NCR

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी नवे डिजिटल पेमेंट प्रॉडक्ट्स लॉन्च केल.

नवी दिल्ली : @GffFintechfest कार्यक्रमात आज भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर श्री. टी. रबी शंकर यांनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे विकसित करण्यात आलेली तीन नवी उत्पादने लॉन्च केली. ही उत्पादने डिजिटल पेमेंट इकोसिस्टम अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सर्वसमावेशक बनवणार आहेत.

लॉन्च करण्यात आलेली उत्पादने खालीलप्रमाणे :

🔹 UPI Multi-Signatory – या सुविधेमुळे संयुक्त खातेधारक (joint account holders) आता UPI द्वारे पेमेंट करू शकतील. यात व्यवहारासाठी एका किंवा अधिक स्वाक्षरीधारकांची (signatories) मंजुरी आवश्यक असेल, ज्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होतील.

🔹 Wearable Glasses वरून UPI Lite द्वारे व्यवहार – या नव्या तंत्रज्ञानामुळे वापरकर्ते आता स्मार्ट ग्लासेसद्वारे ‘हॅन्ड्स-फ्री’ पद्धतीने पेमेंट करू शकतील. QR कोड स्कॅन करून, आवाजाच्या माध्यमातून ओळख पटवून आणि मोबाईल किंवा PIN न वापरता छोट्या रकमेचे व्यवहार पूर्ण करता येतील.

🔹 Forex on BharatConnect (BBPS) – या सुविधेमुळे ग्राहकांना आता त्यांच्या आवडत्या बँकिंग किंवा पेमेंट अ‍ॅपवरून थेट यूएस डॉलर (USD) मिळवता येतील. भारत कनेक्ट प्लॅटफॉर्मद्वारे (Bharat Bill Payment System – BBPS) परकीय चलन व्यवहार अधिक सुलभ होतील.

या नव्या सुविधांमुळे भारतातील डिजिटल पेमेंट प्रणाली आणखी प्रगत, सुरक्षित आणि वापरकर्ता-अनुकूल होईल, असे रबी शंकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!