जळगावात युवाशक्ती फाउंडेशन व भवरलाल-अँड-कांताबाई जैन मंडळातर्फे “बाप्पाची महाआरती” भव्य आयोजन

जळगाव (प्रतिनिधी): आज जळगाव शहरातील भवरलाल अँड कांताबाई जैन व युवाशक्ती फाउंडेशन आयोजित गणेशोत्सव मंडळातर्फे “बाप्पाची महाआरती” मोठ्या उत्साहात पार पडली.
या महाआरतीत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड चे अध्यक्ष भाऊसाहेब अशोकभाऊ जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आयपीएस दत्तात्रय कराड, युवासेना विभागीय सचिव मा. विराजजी कावडिया, धरणगाव नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश सुरेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख प्रितम शिंदे, युवासेना पदाधिकारी पियूष हसवाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी शेकडो गणेशभक्तांनी सहभाग घेतला. महाआरतीनंतर सुप्रसिद्ध महाबली ढोल-ताशा पथक, चित्तथरारक रोप मल्लखांब प्रात्यक्षिके तसेच पारंपरिक मर्दानी खेळांचे सादरीकरण हे कार्यक्रम प्रमुख आकर्षण ठरले.
या सोहळ्यामुळे परिसर गणेश भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.




