खेल
धरणगाव तालुस्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न.

धरणगाव येथील लिटल बॉसम स्कूल या शाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 6 व 7 ऑगस्ट रोजी करण्यात आलेले होते स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पवार मॅडम यांचे हस्ते करण्यात आले यावेळी तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर जितेंद्र ओस्तवाल तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते या स्पर्धेमध्ये 14 व 17 वर्ष मुलांच्या वयोगटात लिटल बॉसम स्कूल चे संघ विजयी होऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले विजयी संघांना क्रीडा शिक्षक पवन बारी सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले स्पर्धा पार पाडण्यासाठी लिटर बाॅसम स्कूलच्या संचालिका ज्योती जाधव मॅडम व मदतनीस विकी पचेरवार यांनी अनमोल असे सहकार्य केले विजयी संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या





