खेल

नाशिक विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व.

जामनेरच्या इंदिराबाई ललवाणी विद्यालयाने चमक दाखवली

जळगांव (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखालील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव जिल्हा अमॅच्युअर डॉजबॉल असोसिएशन, राष्ट्रीय विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाळीसगाव आणि चाळीसगाव तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन प्रा. एम. वाय. चव्हाण सर यांच्या हस्ते मैदान पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून य. ना. चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जे. बी. शेळके, राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य प्रा. वाय. आर. सोनवणे, तालुका क्रीडा समन्वयक अजय देशमुख, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, मुख्याध्यापक सचिन महाजन, रोटरी क्लबचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, सहसचिव निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश साळुंखे यांनी केले.

स्पर्धेचे तांत्रिक समिती प्रमुख गिरीश पाटील तर स्पर्धा प्रमुख राहुल साळुंखे यांनी कार्यभार सांभाळला.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे :

१७ वर्षाखालील मुलांचे गट :

🥇 विजयी: जळगाव – इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेर

🥈 उपविजेते: जळगाव – बी. यू. एन. रायसोनी विद्यालय, जळगाव

🥉 तृतीय: नंदुरबार – दि. एन. डी. अँड एम. वाय. सार्वजनिक विद्यालय, नंदुरबार

१७ वर्षाखालील मुलींचा गट :

🥇 विजयी: नाशिक – दे. ना. पाटील विद्यालय, गंगापूर

🥈 उपविजेते: जळगाव – सारजाई कुडे विद्यालय, धरणगाव

🥉 तृतीय: जळगाव – बी. यू. एन. रायसोनी विद्यालय, जळगाव

१९ वर्षाखालील मुलांचे गट :

🥇 विजयी: जळगाव – इंदिराबाई ललवाणी ज्युनियर कॉलेज, जामनेर

🥈 उपविजेते: नंदुरबार – दि. एन. डी. अँड एम. वाय. सार्वजनिक विद्यालय, नवापूर

🥉 तृतीय: नाशिक – वाजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज, सिन्नर

१९ वर्षाखालील मुलींचा गट :

🥇 विजयी: जळगाव – इंदिराबाई ललवाणी ज्युनियर कॉलेज, जामनेर

🥈 उपविजेते: नाशिक – दे. ना. पाटील ज्युनियर कॉलेज, गंगापूर

🥉 तृतीय: जळगाव – महाराणा प्रताप विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगाव

स्पर्धेत पंच म्हणून प्रा. समीर घोडेस्वार, निलेश पाटील, सचिन सूर्यवंशी, आंतरराष्ट्रीय खेळाडू विनायक सपकाळे, राष्ट्रीय खेळाडू सुष्मीत पाटील, संकल्प राजपूत, सुमित चिंचोले, धीरज बारी, धीरज वंजारी, पियूष थोरात, तन्मय पाटील, उदय पाटील यांनी काम पाहिले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश साळुंखे, शरद सूर्यवंशी, विजय शितोळे, प्रशांत पाटील, धनंजय चव्हाण, योगेश पांडे, दशरथ राठोड व बलविर राठोड यांनी मोलाचे योगदान दिले.

🔸 जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंनी या विभागीय स्पर्धेत उत्तुंग यश मिळवत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!