पुण्यात २८ फेब्रुवारीला रंगणार ‘विश्व मराठी भाषा कर्तृत्व संमेलन २०२६’; नावनोंदणी सुरू
पुणे: जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अमृतानुभव फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने एका भव्य ‘विश्व मराठी भाषा कर्तृत्व संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा विशेष गौरव केला जाणार आहे.
हा भव्य सोहळा शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे.
सोहळ्याचे मुख्य आकर्षण
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि ‘सारेगमप’ फेम मा. श्री. ज्ञानेश्वरजी मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ या गाण्याने घराघरात पोहोचलेले मेश्राम या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
प्रदान करण्यात येणारे मानाचे पुरस्कार
कार्यक्रमात खालील विविध श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल:
- मराठी भाषा रत्न पुरस्कार
- द ग्रेट मराठी भाषा रत्न अवॉर्ड
- मराठी राजमुद्रा गौरव पुरस्कार
- विश्व मराठी भाषा कर्तृत्व पुरस्कार
- माय मराठी भूषण पुरस्कार
- आदर्श मराठी शाळा कुसुमाग्रज पुरस्कार
- मराठी समाज भूषण पुरस्कार
- राष्ट्रीय मराठी उद्योजक पुरस्कार
- मराठी युवा प्रेरणा पुरस्कार
- मातृभूमी भाषा जीवनगौरव पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप: आकर्षक सन्मानपत्र, भव्य मानचिन्ह, महावस्त्र आणि ओळखपत्र असे या पुरस्काराचे गौरवशाली स्वरूप असेल.
नावनोंदणीची माहिती
या संमेलनासाठी नामांकने स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी इच्छुक व्यक्तींनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
संपर्क: सूरज पवार, यवतमाळ
मोबाईल: +91 73502 36121
”मराठीचा गौरव… अस्मितेचा गौरव” या ब्रीदवाक्यासह आयोजित या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






