महापरिनिर्वाण दिनानिमित्त सम्राट ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.


पिंप्रि खु : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सम्राट ग्रुपतर्फे दीपज्योत प्रज्वलित करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सम्राट ग्रुपने वर्षानुवर्षेप्रमाणे यंदाही हा उपक्रम सुसंस्कार व सामाजिक ऐक्य जपण्याच्या उद्देशाने साजरा केला. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती चे माजी सभापती अनिल पाटील, ग्रामपंचायतचे उपसरपंच डी. बी. मनोरे, माजी उपसरपंच प्रकाश लोखंडे, एडवोकेट गजरे वकील साहेब, शांताराम मोरे, सिराज कुरेशी, समाधान पाटील, कृष्णा मोरे, गौतम दोडे, आडांघे साहेब, विजय लोखंडे, बापू नरवाडे, शुभम नरवाडे, राज अहिरे, यश चौधरी, अजय बिजबिरे, दीपक अहिरे, रोहित मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सम्राट ग्रुप मित्र परिवाराची युवा टीम तसेच गावातील समस्त महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त करून देणारा ठरला. दीपप्रज्वलनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उजळणी करत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. सम्राट ग्रुपतर्फे आयोजित हा उपक्रम महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत समाजात जागरुकता, बंधुता आणि समानतेचे मूल्य जोपासण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.




