आरोग्यदायी शनिवार उपक्रमात शुगर बोर्ड जनजागृती कार्यक्रम


सुपोषित जळगाव उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करणवल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या आदेशानुसार आरोग्यदायी शनिवार अभियानाचा एक भाग म्हणून उपकेंद्र पाळधी बु. अंतर्गत पि. एम. श्री. जि. प. उच्च माध्यमिक कन्या शाळा, पाळधी येथे शुगर बोर्ड जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सायमा खान यांनी विद्यार्थिनींना मधुमेहाविषयी सविस्तर माहिती देत आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या सोबत आरोग्यसेविका कु. चेतना पाटील, आरोग्यसेवक अतुल नन्नवरे व प्रदीप अडकमोल यांनी सहकार्य केले.
कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी माहितीपर नृत्य सादर करत आरोग्यदायी व अपायकारक आहारातील फरक अतिशय सोप्या भाषेत मांडला. पथनाट्यातून त्यांनी संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी यांचे महत्त्व प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. संगीता असोदेकर, सहाय्यक शिक्षिका सौ. ज्योती वाघ, वंदना चौधरी, गीता काळे, ज्योती राणे, वैशाली जाधव तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष योगदान दिले.
स्थानिक आरोग्य यंत्रणा व शिक्षण क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जनजागृतीचा हा उपक्रम यशस्वी ठरला.




