पाळधी येथे खान्देशाची आराध्य दैवत मरी मातेचा भंडारा उत्साहात संपन्न.

पाळधी बु (ता. धरणगाव) येथे , मंगळवार दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी खान्देशाची आराध्य दैवत मरीमाते चा भंडाऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला. सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाची सुरुवात होऊन भाविकांच्या उपस्थितीत वातावरण भक्तिरसाने दुमदुमून गेले.
या भंडाऱ्याची खास ओळख म्हणजे उडदाची डाळ व भाकरीचा महाप्रसाद. भाविकांना या पारंपरिक महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसरात जयघोष, भक्तिरस आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माता-भगिनी, युवक-तरुण तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी सामाजिक सहकार्य दिले. ग्रामस्थांच्या पुढाकाराने आणि मंडळाच्या सक्रिय सहभागामुळे भंडारा उत्सव यशस्वीपणे पार पडला.
विशेष म्हणजे, उत्तराखंड येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तेरा भाविकांनी परत येऊन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.




