महाराष्ट्रराज्य

“पंढरपूर येथे होणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्यस्तरीय अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते”

अंमळनेर | प्रतिनिधी
येणाऱ्या १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा लोगो अनावरण सोहळा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अमळनेर येथे नुकताच पार पडला.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा उपाध्यक्ष उमेश धनराळे, सोशल मिडिया प्रमुख बापूराव ठाकरे, जिल्हा संघटक जयेश काटे, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भामरे, शहराध्यक्ष जयंतलाल वानखेडे, उमाकांत ठाकूर यावेळी उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांतील पत्रकार एकत्र आणून विचारमंथन, संवाद व पत्रकार हिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या वेळी संघटनेच्या कार्याचा गौरव करत पत्रकार समाजाचे लोकशाहीतील योगदान अधोरेखित केले. तसेच अशा अधिवेशनांमुळे पत्रकारितेतील ऐक्य व व्यावसायिक भान वृद्धिंगत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की या अधिवेशनात पत्रकारांसाठी विविध मार्गदर्शन सत्रे, सन्मान सोहळे आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
फोटो कॅप्शन: अमळनेर येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्यस्तरीय अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण करताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!