धरणगावात महात्मा बळीराजांची भव्य मिरवणूक व पूजन.
▪️सम्राट बळीराजांचे स्मारक व्हावे,- एकमुखी मागणी

धरणगाव : येथे “बळीराजा लोकोत्सव समितीच्या” वतीने बळीराजा स्मृतीदिनानिमित्त भव्य मिरवणूक आणि पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत बळीराजांची आकर्षक प्रतिमा आणि पारंपरिक लाकडी नांगर बैलगाडीतून सजवून नेण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मिरवणुकीला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजे न्याय, समता, दानशीलता आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेल्या महात्मा बळीराजांचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस. भारतीय संस्कृतीत बळीराजा हे न्यायप्रिय, दानशूर आणि सर्वसमावेशक राज्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कालखंडात जात, वर्ण आणि लिंगभेदाचा अंशही नव्हता. म्हणूनच दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी “इडपिडा टळो, बळीचे राज्य येवो!” या मंगल उच्चारांसह शेतकरी आणि माता-भगिनी बळीराजा लोकोत्सव साजरा करतात. या अनुषंगाने सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकास अभिवादन करून मिरवणुकीचा शुभारंभ झाला. धरणी चौक, जैन गल्ली, पिल्लू मस्जिद, धनगरवाडा, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छ.शिवाजी महाराज स्मारक, परिहार चौक, लांडगे गल्ली, शास्त्री स्मारक मार्गे ही मिरवणूक मार्गक्रमण करत कोट बाजारातील साने पटांगण येथे संपन्न झाली. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांचा रुमाल, टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहरप्रमुख भागवत चौधरी, मोठा माळी वाडा समाजाचे अध्यक्ष व्ही टी माळी, माजी अध्यक्ष तथा शेतकरी विठोबा माळी, कुणबी पाटील समाजाध्यक्ष माधवराव पाटील, माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, आर डी महाजन, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, माजी सचिव दशरथ महाजन, गोपाल महाजन, जेष्ठ पत्रकार कडु महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र ठाकरे, माजी उपनगराध्यक्ष उमेश महाजन, नूतन सोसायटी चेअरमन कैलास मराठे, जितेंद्र पुरभे, संजय चौधरी, प्रभूदास जाधव, टोनी महाजन, किरण अग्नीहोत्री, रमेश महीपत चौधरी, रामचंद्र महाजन, नंदलाल महाजन, बंटी पवार, योगेश येवले, गणेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)चे तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, प्रगतिशील शेतकरी रावा आप्पा माळी, नंदू धनगर, राजेंद्र बिऱ्हाडे, बापू धनगर, मधुकर धनगर, भिका धनगर, भावसु धनगर, दिनेश येवले, राजेंद्र माळी, बापू माळी, नाना महाजन, भूषण महाजन, अरुण वाघ, नवल महाजन, रामचंद्र महाजन, भगवान महाजन, सुरेश महाजन, सुरेश माळी, पिंटू माळी, राहुल मराठे, नितेश माळी, नाना महाजन एरंडोल, निंबा निकम, उमेश महाजन, दयाजी महाजन, लिलाधर महाजन, प्रकाश वाघ, भाऊसाहेब महाजन, रामकृष्ण माळी, वासुदेव माळी, दिपक माळी, रमेश चौधरी, भिमराज माळी, जांभोऱ्याचे रघुनाथ पाटील, विनायक पाटील, बाबुराव महाजन, नानुराज महाजन, रमेश सपकाळे, गंगापुरीचे विजय पाटील, बाभळ्याचे वाल्मिक पाटील, हेमकांत पाटील, भाऊसाहेब पाटील, भोण्याचे मकरध्वज पवार, प्रविण पाटील, अरुण पाटील, रविंद्र पाटील, भैय्या पटेल यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना लक्ष्मणराव पाटील म्हणाले की, महात्मा बळीराजा हे भारतीय शेती संस्कृतीचे जनक आहेत. पाच वर्षांपासून बळीराजा गौरव मिरवणूक अतिशय उत्साहात संपन्न होते. बळीराजांनी श्रम, समता आणि न्याय यावर आधारित समाजव्यवस्था निर्माण केली. आजच्या पिढीला बळीराजांच्या कार्याचा परिचय करून देणे ही काळाची गरजेचे आहे, असे मत श्री.पाटील यांनी मांडले. उपस्थित सर्वांच्या वतीने गुलाबराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बळीराजा केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचा अन्नदाता आहे. त्याच्या श्रमाने आणि त्यागाने देशाचा पाया मजबूत राहतो. त्यामुळे धरणगावात ‘महात्मा बळीराजांचे स्मारक’ उभारले जाणे ही समाजाचा आत्मसन्मान जपणारी ऐतिहासिक कृती ठरेल असे श्री वाघ म्हणाले. यानंतर बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने नगरपरिषद धरणगाव येथील कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांना साने पटांगणावर महात्मा बळीराजाचे स्मारक व्हावे या आशयाचे निवेदन देण्यात आले. चार वर्षांपूर्वी विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बळीराजा स्मारक व्हावे यासाठी होकार दर्शविला होता. यावर्षी बळीराजा गौरव मिरवणुकीचे पाचवे वर्ष असून शासन दरबारी पाठपुरावा व निधीची विशेष तरतूद करून लवकरात लवकर “महात्मा बळीराजाचे भव्य स्मारक साने पटांगणावर व्हावे अशी एकमुखी मागणी बळीराजा लोकोत्सव समिती व सर्व शेतकरी – कष्टकऱ्यांनी केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकोत्सव समितीचे गोरख देशमुख, हेमंत माळी, किशोर पवार, भगवान शिंदे, प्रफुल पवार, विनोद रोकडे, गौतम गजरे, मोहीत पवार, गोपाल पाटील, रमेश चव्हाण, सचिन पाटील, सागर पारधी, भैय्या धनगर, मोहीत पवार, निवृत्ती महाजन, जुनेद बागवान, साजिद कुरेशी, अविनाश करोसिया, खलील खान, गोपाल माळी, रमेश महाजन, सागर महाले, लक्ष्मणराव पाटील, आबासाहेब वाघ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद रोकडे व हेमंत माळी यांनी तर आभार प्रदर्शन आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले.




