लोकल न्यूज़

धरणगाव शहरात गणेशोत्सवाची धूम – मोरया गणेश मित्र मंडळ पारोळा नाका चा राजा चे आगमन

प्रतिनिधी- रवींद्र निकम

धरणगाव : धरणगाव शहरात आज गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात मोरया गणेश मित्र मंडळ पारोळा नाका चा राजा या मंडळाची श्री गणपती बाप्पाची मूर्ती आगमन झाली. या आगमनावेळी शहरात भक्तीमय जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

श्रींच्या आगमनावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तसेच धरणगाव नगरीचे मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश भाऊ चौधरी यांच्या हस्ते श्री गणपती बाप्पाचे पूजन व स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी धरणगाव पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. पवार साहेब, मोरया गणेश मित्र मंडळ पारोळा नाका चे अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच परिसरातील तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशभक्तांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत होताच परिसरात उत्सवमूर्तीचा आनंद द्विगुणित झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!