युवा

सूरज सुधाकरराव पवार यांची ‘बंजारा ब्रिगेड’च्या यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती

​यवतमाळ: बंजारा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सूरज सुधाकरराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

​बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविकांत राठोड यांच्या सहमतीने आणि प्रदेशाध्यक्ष राहुल राठोड यांनी सूरज पवार यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. सूरज पवार हे मुळचे शेलु (ता. आर्णी, जि. यवतमाळ) येथील रहिवासी असून ते पत्रकारितेच्या माध्यमातूनही कार्यरत आहेत.

​समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

बंजारा समाजाला मान, सन्मान, न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी तसेच संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सूरज पवार कार्यरत राहतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने समाजहित आणि राष्ट्रहित जोपासण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

​सूरज पवार यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!