युवालोकल न्यूज़
Trending

सातपुड्यातील तिसऱ्या पुढ्यात देवझिरी येथे समाजकार्य विभागाचे ग्रामीण अध्ययन शिबीर (पी. आर. ए) उत्साहात संपन्न.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव, सामाजिक शास्त्रे प्रशाळा, समाजकार्य विभाग आयोजित ग्रामीण अध्ययन शिबीर (पी. आर. ए) देवझिरी ता. चोपडा याठिकाणी दिनांक 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी याकालावधीत संपन्न झाले. प्रारंभी मशाल फेरी काढून स्थानिकांचा सहभाग घेऊन त्यांना विकास व लोकसहभागाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे उदघाटन पार पडले यावेळी गावातील उपसरपंच, बचतगट महिला महिला मंडळ आदींची लक्षणीय उपस्थिती होती. यानंतर समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी शिबीर कालावधीत देवगड, देव्हारी व देवझिरी सूक्ष्म अभ्यास करून पी. आर. ए. च्या टूल्स उद्या:- सामाजिक गांव नकाशा, संधी चित्र, चपाती आराखडा, ऋतुचक्र, लक्ष्य गट चर्चा युवक – युवती, महिला पुरुष, शेतकरी या सर्व टूल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विकासाच्या संधी, समस्या व गरजा नागरिकांना पटवून दिल्यात यावेळी विविध सामाजिक विषयांना घेऊन विद्यार्थ्यांनी जनमाणसाचे प्रबोधन करत विचार करायला भाग पाडले.

यावेळी शेत शिवार फेरी व जंगल सफारी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शेत शिवार मृदा पाणी व वनउपज, प्राणी, पशु, वृक्ष पिके आदींचा सकोल अभ्यास केला यावेळी वन विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. यानंतर MP मधील धवली येथील बाजारात जाऊन विद्यार्थ्यांनी केस स्टडी केली.

तसेच समारोपाच्या पुर्वसंधेला कॅम्प फायर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पारंपरिक नृत्य केले. तसेच दिनांक 28 रोजी सकाळी 11 वाजेला शासकीय आश्रम शाळा देवझिरी येथे समारोपीय कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील सर हे होते. तर अध्यक्ष गावातील उपसरपंच ताई हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका वर्षा पालखे यांनी केले तर, तसेच शिबिरा दरम्यान आलेले अनुभव कथन, विनायक गवळी, देविदास खुळे, राहुल बागुल व वैशाली कोळी यांनी अनुभव कथन केले. तदनंतर प्रा. योगेश माळी यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा मांडला. यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग यावल श्री. संदीप पाटील सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शिबीर कालावधीत आलेला अनुभव व मिळालेलं शिक्षण आयुष्यभर कामी येईल असा आशावाद व्यक्त करत विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले कार्य व वापरलेले टूल्स याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश बारेला यांनी केले. तर आभार प्रा. विनेश पावरा यांनी मानले. शिबीर समन्वयक म्हणून प्राध्यापिका वर्षा पालखे, प्रा. विनेश पावरा, प्रा. योगेश माळी यांनी मेहनत घेतली. समारोप प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!