देशधर्म
Trending

पोहरादेवी येथे विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – श्री सुरज पवार 

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील भक्तीधाम आश्रमात रविवार, २२ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत “विशाल हिंदू संमेलन” मोठ्या उत्साहात पार पडले. सकल हिंदू समाज पोहरादेवी मंडळाच्या वतीने आयोजित या संमेलनाला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात आशिर्वचनाने झाली.महंत जितेंद्र महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.

यानंतर प्रेरक उद्बोधन सत्रात मोहन सुदर्शन गिरी महाराज (प्रयागराज) यांनी अध्यात्म आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. संत रामराव बापू मठ (असोला खुर्द) यांच्यासह माननीय श्री सागर रामचंद्र खरे (अकोला विभाग संयोजक) यांनी हिंदू समाजाच्या एकजुटीवर भर दिला.

तसेच माननीय डॉ. सौ. निकिता महेश चव्हाण (एमडी त्वचारोग तज्ञ व उपाध्यक्ष, गीता परिवार, यवतमाळ जिल्हा) यांनी आरोग्य व सामाजिक जागरूकतेविषयी मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रमात धार्मिक वातावरण, शिस्तबद्ध आयोजन आणि समाजातील विविध घटकांचा सहभाग यामुळे संमेलन यशस्वी ठरले. उपस्थितांनी अशा कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य व संस्कार वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!